पोस्ट्स

ओंजळ..

 ओंजळ आज तू केलीस मोत्यांची ओंजळ रीती भ्रांत नसे कसलीच गुंग झाली मती. घेरून येता विळखा रोमरोम उठली घुसळण क्षीर कासेचे न्हाऊन स्पर्शात तुझी परजण  ओलसर सारे किनारे लाटांची अवखळ गर्दी तुफानाला शमवून गेली तुझी तृषार्त नदी. तो धुमसत राहिला कधी सुसाट वारा नावे तुझ्याच वाहिला मी समुद्र पहिला. जयवंत 10/04/2020.

अहोरात्र

            अहोरात्र सकाळी तुझी रोजच धांदल उडते अर्धा बिछाना आवरून नजरेचे पांघरुन ओठांवरचे चांदणे केसांचे ढग सारून अंगणा आधी सडा पडतो माझ्यावर तुझ्या चुंबनांचा पहाटेच दौडत निघते उगवतीला न्हाऊन रथाची चाके पळवितेस तुझ्या मनाचे महाभारत फलटाचे कुरुक्षेत्र आणि माझाही संजय होतो अर्ध ओल्या केसांना सुकवत तू झोपेची घडी घालून पुन्हा कुशीत शिकतेस, माझ्याच विचारांच्या उबदार पांघरुणात अलगद विसावते, कानात पुटपुटत, ओठांनी कानपाळी चुंबून म्हणतेस, मला जवळ घेशील, थकले रे, पण.. तुला सोडावत नाही वेगाला लगाम लावतेस दोन थेंब टिपतेस विरहाचे, फलाटाचे अंतरही जपतेस मग तू हरवते पिलावळीत...... माझ्या लेकरांना मोकाट सोडून... तू रहाटगाडगे घुमविते तीन तीन कप्प्यांचे सूर्योदया पासून चंद्रास्तापर्यंत  अविरत.. अहोरात्र..... मला हिंदोळत        जयवंत कुलकर्णी 
     माझे पोलाद वितळते माझे पोलाद वितळते तुझ्या खोल पापण्यात वारी होते पावलांची तुझी वाट पाहण्यात ओंजळीची होती कमळे बाहूंचे झुलती झोपाळे शब्दात उमटतो वेद तुझ्या अश्रूंचा खेद ओठी माझ्या धनुष्याला तुझ्या नजरेचे तूनीर बुद्धीच्या प्रेरणेला अवघा तुझाची विचार           जयवंत कुलकर्णी 

श्रावण सरी

इमेज
                                     श्रावण सरी                    मित्रहो, आजपासून श्रावण महिना सुरू झाला आहे. तो सुरू झाला की बालपण आठवू लागते. एकेकाळी गावाकडे श्रावणाच्या तयारीचा भाग म्हणून आधी  जिवतिच्या प्रतिमेचा घरभर शोध घेण्यासाठी बाया बापड्या कित्येक तास खटाटोप करायच्या. श्रावणातल्या कहाण्या, संपूर्ण चातुर्मासाच्या पुस्तकातील ग्रीक मायथाॅलॉजीला पुरून उरेल अशी कथानके, पात्रे आणि घटनास्थळे यांच्या भावनिक संस्कारांचा फार झटकन प्रभाव पडायचा. आमच्या दोन काकू नदीतले चमकदार तुरटी सारखे दिसणारे शिरगोळे उगाळून घ्यायच्या. त्याच्या अजब गजब रंगांनी भिंतींवर वारली चित्रशैलीशी नाते जोडणारे नागकुळ काढायच्या. आख्खी भिंत हेच देवघर वाटू लागायची. ते शिरगोळे आज दिसेनासे झालेत बहुदा. गोकुळाष्टमीच्या आदल्या दिवशी नदीतील चिखल आणून पाटावर गोकुळ बनविण्याचा प्रकार तर आजच्या केजी मध्ये  मातीकाम शकणार्‍या मुलांना दूरदूर पर्यन्त कोणी सांगेल का असा प...

गोफ

इमेज
      गोफ  मी चालतो आहे                                                       सात पावले , वामनरुपी                                     व्यापून तुझ्या भाळावरचे                                          अवघे निरभ्र आकाश                                                 ओंजळीत धरू पाहतो                                         तझ्या कातळा पल्याडचे            ...

अनटोल्ड

अनटोल्ड तुला जमले तरच  बोलत जा हाकेला उत्तर देत जा नजरेला नजर देत जा आलाच राग कधी तरी त्यालाही रस्ता देत जा. चंद्र चांदण्या पाहात जा कोवळी उन्हं झेलत जा ओठांना लाली लावत जा पापण्यातले काजळी कोन रेखीत जा जगभर जगणं जगत जा चालताना थोड थांबत जा तुझे उसंत श्वास घेत जा आरशातला अवतार पहात जा सगळे सगळे सोडुन घोटभर पाणी पित जा. एकटीच आडवाट तुडवत जा आॅफिसला दांडी मारत जा हवं नको ते सगळंच करत जा तू माझी असलीस म्हणून काय झालं तुझ्याही मनाचं ऐकत जा मी तर आहेच गं तुझा तूही तुझं आयुष्य जगत जा तूही तुझं जगणं जगत जा.        जयवंत कुलकर्णी 

उनाड माळावरती

इमेज
                                                                                                                                                                                                                                                                                            ...