ओंजळ..
ओंजळ
आज तू केलीस
मोत्यांची ओंजळ रीती
भ्रांत नसे कसलीच
गुंग झाली मती.
घेरून येता विळखा
रोमरोम उठली घुसळण
क्षीर कासेचे न्हाऊन
स्पर्शात तुझी परजण
ओलसर सारे किनारे
लाटांची अवखळ गर्दी
तुफानाला शमवून गेली
तुझी तृषार्त नदी.
तो धुमसत राहिला
कधी सुसाट वारा
नावे तुझ्याच वाहिला
मी समुद्र पहिला.
जयवंत
10/04/2020.
आज तू केलीस
मोत्यांची ओंजळ रीती
भ्रांत नसे कसलीच
गुंग झाली मती.
घेरून येता विळखा
रोमरोम उठली घुसळण
क्षीर कासेचे न्हाऊन
स्पर्शात तुझी परजण
ओलसर सारे किनारे
लाटांची अवखळ गर्दी
तुफानाला शमवून गेली
तुझी तृषार्त नदी.
तो धुमसत राहिला
कधी सुसाट वारा
नावे तुझ्याच वाहिला
मी समुद्र पहिला.
जयवंत
10/04/2020.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा