पोस्ट्स

ऑगस्ट, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अहोरात्र

            अहोरात्र सकाळी तुझी रोजच धांदल उडते अर्धा बिछाना आवरून नजरेचे पांघरुन ओठांवरचे चांदणे केसांचे ढग सारून अंगणा आधी सडा पडतो माझ्यावर तुझ्या चुंबनांचा पहाटेच दौडत निघते उगवतीला न्हाऊन रथाची चाके पळवितेस तुझ्या मनाचे महाभारत फलटाचे कुरुक्षेत्र आणि माझाही संजय होतो अर्ध ओल्या केसांना सुकवत तू झोपेची घडी घालून पुन्हा कुशीत शिकतेस, माझ्याच विचारांच्या उबदार पांघरुणात अलगद विसावते, कानात पुटपुटत, ओठांनी कानपाळी चुंबून म्हणतेस, मला जवळ घेशील, थकले रे, पण.. तुला सोडावत नाही वेगाला लगाम लावतेस दोन थेंब टिपतेस विरहाचे, फलाटाचे अंतरही जपतेस मग तू हरवते पिलावळीत...... माझ्या लेकरांना मोकाट सोडून... तू रहाटगाडगे घुमविते तीन तीन कप्प्यांचे सूर्योदया पासून चंद्रास्तापर्यंत  अविरत.. अहोरात्र..... मला हिंदोळत        जयवंत कुलकर्णी 
     माझे पोलाद वितळते माझे पोलाद वितळते तुझ्या खोल पापण्यात वारी होते पावलांची तुझी वाट पाहण्यात ओंजळीची होती कमळे बाहूंचे झुलती झोपाळे शब्दात उमटतो वेद तुझ्या अश्रूंचा खेद ओठी माझ्या धनुष्याला तुझ्या नजरेचे तूनीर बुद्धीच्या प्रेरणेला अवघा तुझाची विचार           जयवंत कुलकर्णी 

श्रावण सरी

इमेज
                                     श्रावण सरी                    मित्रहो, आजपासून श्रावण महिना सुरू झाला आहे. तो सुरू झाला की बालपण आठवू लागते. एकेकाळी गावाकडे श्रावणाच्या तयारीचा भाग म्हणून आधी  जिवतिच्या प्रतिमेचा घरभर शोध घेण्यासाठी बाया बापड्या कित्येक तास खटाटोप करायच्या. श्रावणातल्या कहाण्या, संपूर्ण चातुर्मासाच्या पुस्तकातील ग्रीक मायथाॅलॉजीला पुरून उरेल अशी कथानके, पात्रे आणि घटनास्थळे यांच्या भावनिक संस्कारांचा फार झटकन प्रभाव पडायचा. आमच्या दोन काकू नदीतले चमकदार तुरटी सारखे दिसणारे शिरगोळे उगाळून घ्यायच्या. त्याच्या अजब गजब रंगांनी भिंतींवर वारली चित्रशैलीशी नाते जोडणारे नागकुळ काढायच्या. आख्खी भिंत हेच देवघर वाटू लागायची. ते शिरगोळे आज दिसेनासे झालेत बहुदा. गोकुळाष्टमीच्या आदल्या दिवशी नदीतील चिखल आणून पाटावर गोकुळ बनविण्याचा प्रकार तर आजच्या केजी मध्ये  मातीकाम शकणार्‍या मुलांना दूरदूर पर्यन्त कोणी सांगेल का असा प्रश्न पडतो.  श्रावणाचा भागच असलेल्या  शुक्रवारच्या हळदी कुंकवाची लगबग, गूळ चणे फुटाणे यांचा प्रसाद,मंगळागौरीसाठी माहेरी हेलकावे खाणारे नव विवाहित लेकीचं म