गोफ

गोफ मी चालतो आहे सात पावले , वामनरुपी व्यापून तुझ्या भाळावरचे अवघे निरभ्र आकाश ओंजळीत धरू पाहतो तझ्या कातळा पल्याडचे तेजःपुंज , सूर्यबिंब. अथांगात डुंबणारे तुझे मन अवघे , सदैव निर्वेध अलगद विसावेल तुझ्यासह माझ्या प्रवाळ हृदयी गवसेल जरी कधी क्षणभर एकांत , उसंत कवेत घेईन असाच मी तुझ्या सगर्भ निर्झरांना तारून नेईल एकतरी मी माझे गलबत शिडाचे किनार्याना तिथेच होईल प्रीतीसंगम इहलोकीच्या पुनर्जन्मीचा स्वर्गीच्या गाठींवर बांधीन मी