मी एकटा पडतो खूप
हात दुरावतात,
हवेत झुलतात, नजर नजरे आड होत जाते,
 खरं सांगू का तुला,
मन पिशाच्च होतं,
तू अशी मला ना
जेव्हा पोरकं करून जाते जेव्हा जेव्हा.

डोळ्यांच्या चुली पेटतात
 मनाची ओली गच्च लाकडे शिलगावून
आत्मा शेकत बसतो
गप गुमान, ऊतू जाणारं
ह्रदयाचं क्षीरपात्र ढवळत, तरीही येतोच
एखादा ओघळ ओसंडून, तेव्हा ना मी
खरंच खूप खूप एकटा पडतो गं......

धूर धूर धूराळा उडतो
थोडा बाहेर जादा आत
भावनांचा, विचारांचा
आजूचा माझ्या बाजूच्या तूझ्या सगळ्या सगळ्या क्षुल्लक गोष्टींना कवेत घेऊन
जातो एका विस्तीर्ण उंचीवर, धूर की धुके
काही कळेनासे होते
तेव्हा ना मी खूप खूप
एकटा एकटा पडतो गं...
               
            जयवंत कुलकर्णी
    

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गुरुजनहो गतिमान होऊया !

तिन्ही सांजेला कविता