पोस्ट्स

जानेवारी, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संधीप्रकाशात

                                                                संधीप्रकाशात               आज १ जानेवारी २०१८, नवीन वर्षाची  नवी सुरुवात. नवीन वर्षात म्हणे लोक बरेच काही संकल्प करतात. हे लिखाण म्हणजे माझा संकल्प वगैरे अस काहीच नाही. पण डोक्यात साचलेले  बरेच काही डिलीट करण्यापूर्वी  जमेल तेवढं आपलसं वाटणारं बाजूला काढून मग कचरा निर्मुलन करावं म्हटल. वेळ मिळेल तसतसं. तसा मी लेखक, कवी,फार मोठा वलयांकित व्यक्ती अथवा उत्तम ब्लॉगर्स पैकी मुळीच कोणीही नाही. वाचनाचीही तशी जुजबी आवड. हल्ली हल्ली या संगणकावर ब्लॉग लिहून आपल्याच दुनियेतील जगभर विखुरलेल्या लोकांपर्यंत पोहचता येत, भावलेलं मांडता येत, आणि आजची गरज म्हणजे शेअर करता येत म्हणून केलेला उपद्व्यापच, बघावं म्ह्टल करून. यात विषयांची सरमिसळ नक्कीच होणार. वर्तमानाची नाडी पकडून लिखाणाच्या गोफणीतला  विषयाचा दगड कधीही भूतकाळात भिरकावला जावू शकतो. मूळ पिंड शिक्षकाचा असला तरी काही गोष्टी  उलट्या चष्म्यातून पाहण्याची अंगवळणी पडलेली सवय मात्र त्याला धरून असेलच अस अजिबात नाही. खरंतर शाळा, विद्यार्थी, अभ्यास, गृहपाठ, शालेय उपक्रम, पालक, सहकारी शिक्