पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तिन्ही सांजेला कविता

इमेज
 *तिन्ही सांजेला*      खूप खूप आठवण येते तुझी तिन्ही सांजेला... मावळतीचा सूर्य घेऊन जातो आणखी एक ओसाड दिवस  असेच सरलेत महिनोन्महिने क्षितिज रिकामं रिकामं होतं  निळ्याशार पाण्याच्या लाटा किनाऱ्यावर येतात जातात मी निमुटपणे मागे फिरतो हाताची पाठमोरी घडी घालून रिकाम्या हाताने....... मनाची तेलवात जळत राहते काळजाचा कोनाडा तेवत मंद कुठलासा सूर ऐकू येतो रोज सतारीचा कधी वेणूचा असतो तो मी आपला चष्मा चिमटीत धरून उगाचच वर नजर टाकतो हळवी इथेच कुठतरी तूही असशील म्हणत  मला न्याहाळत कावरीबावरी अगदी माझ्यासारखीच... चंद्र चांदणे मोजून झालेत रात्रीच्या रात्री गारद झाल्यात मी पुन्हा किनारा गाठतो तोच एका निर्जन खडकावर आशेने तू धडक येशील असशील तिथून  ठरल्या वेळी गजरा माळून चाहूल लागते, ओठ रुंदावत मी मागे वळून नाही बघत... पण खांद्यांवर श्वास हलतात तिन्ही सांजेला रोज...रोज... तुझाच... जयवंत