पोस्ट्स

तिन्ही सांजेला कविता

इमेज
 *तिन्ही सांजेला*      खूप खूप आठवण येते तुझी तिन्ही सांजेला... मावळतीचा सूर्य घेऊन जातो आणखी एक ओसाड दिवस  असेच सरलेत महिनोन्महिने क्षितिज रिकामं रिकामं होतं  निळ्याशार पाण्याच्या लाटा किनाऱ्यावर येतात जातात मी निमुटपणे मागे फिरतो हाताची पाठमोरी घडी घालून रिकाम्या हाताने....... मनाची तेलवात जळत राहते काळजाचा कोनाडा तेवत मंद कुठलासा सूर ऐकू येतो रोज सतारीचा कधी वेणूचा असतो तो मी आपला चष्मा चिमटीत धरून उगाचच वर नजर टाकतो हळवी इथेच कुठतरी तूही असशील म्हणत  मला न्याहाळत कावरीबावरी अगदी माझ्यासारखीच... चंद्र चांदणे मोजून झालेत रात्रीच्या रात्री गारद झाल्यात मी पुन्हा किनारा गाठतो तोच एका निर्जन खडकावर आशेने तू धडक येशील असशील तिथून  ठरल्या वेळी गजरा माळून चाहूल लागते, ओठ रुंदावत मी मागे वळून नाही बघत... पण खांद्यांवर श्वास हलतात तिन्ही सांजेला रोज...रोज... तुझाच... जयवंत

संदर्भ कविता

  संदर्भ... ऐकूच जात नाही असेही काही असतात  दीर्घ आवाज, काही शब्द, काही कटाक्ष काळाच्या वेदीवर, रोज आहुती पडते आठवणींची, वेदनेची आणि आश्रुंची. खरतर माहीतच नव्हतं असेही असतात काही दिवस, काही रात्री काहीं  रवंथ... कळतच नाही ना , असेही काही असतात उसासे, काही टीपं, काही कोपरे, एकांत खरतर नि:शब्द करून जातात ना काही वर्तनाची आवर्तनं, तकलादू नितीशास्त्र, कारण काळ बदलतो ,तशी माणसंही... त्यांनाही असतातच की प्राक्तनाचे संदर्भ.  जयवंत. ( २ सप्टेंबर, २०२० )

हे असं का होतं ( कविता )

हे असं का होतं ? उगाच मन खट्टू होऊन बसतं राग नसतो, रुसवा नसतो असले अंतर भेटीतले तरी मनाचं पाखरू उडू लागतं फांदी फांदी शोधू लागतं हे असं का होतं ? दरवाजावर टक टक करतं तुझ्या पावलांची चाहूल घेतं कडी उघडण्याचा आवाज ऐकतं किलकिल्या डोळ्यांनी फटीत बघतं चेंगरल्या पंखांनी टवकारू लागतं हे असं का होतं ? दार उघडतं, आणि बंद होतं, चिमुरडं उर धडधडून  उठतं चौकट सोडून खिडकीत जातं तावदान, हलकड्या आपटू लागतं चोचीचा आ वासून हुंदडत रहातं हे असं का होतं ? पंख आपटतं, चोच घासत व्याकुळ, हळवं  खूप आसुसतं उठता बसता घिरट्या घालतं खोल खोल काळजाचा ठाव घेतं उलघाल करीत माणूस शोधतं हे असं का होत ? त्याचं शिवार , त्याचं माळरान सारंच सैरभैर, सारंच हैराण. नुसती तगमग, रणरण भयाण उठता बसता, कोलमडू लागतं दे माय धरणी ठाय म्हणतं हे असं का होतं ? तुझ्या घरट्यात शिरू पहातं कट्टीबट्टी धरू लागतं थोडं हट्टी, थोडं अवखळ तुझा आडोसा शोधू लागतं ओक्साबोक्शी रडू लागतं हे असं का होतं ?  जयवंत. ( २१/०६/२०२०)

ओंजळ..

 ओंजळ आज तू केलीस मोत्यांची ओंजळ रीती भ्रांत नसे कसलीच गुंग झाली मती. घेरून येता विळखा रोमरोम उठली घुसळण क्षीर कासेचे न्हाऊन स्पर्शात तुझी परजण  ओलसर सारे किनारे लाटांची अवखळ गर्दी तुफानाला शमवून गेली तुझी तृषार्त नदी. तो धुमसत राहिला कधी सुसाट वारा नावे तुझ्याच वाहिला मी समुद्र पहिला. जयवंत 10/04/2020.

अहोरात्र

            अहोरात्र सकाळी तुझी रोजच धांदल उडते अर्धा बिछाना आवरून नजरेचे पांघरुन ओठांवरचे चांदणे केसांचे ढग सारून अंगणा आधी सडा पडतो माझ्यावर तुझ्या चुंबनांचा पहाटेच दौडत निघते उगवतीला न्हाऊन रथाची चाके पळवितेस तुझ्या मनाचे महाभारत फलटाचे कुरुक्षेत्र आणि माझाही संजय होतो अर्ध ओल्या केसांना सुकवत तू झोपेची घडी घालून पुन्हा कुशीत शिकतेस, माझ्याच विचारांच्या उबदार पांघरुणात अलगद विसावते, कानात पुटपुटत, ओठांनी कानपाळी चुंबून म्हणतेस, मला जवळ घेशील, थकले रे, पण.. तुला सोडावत नाही वेगाला लगाम लावतेस दोन थेंब टिपतेस विरहाचे, फलाटाचे अंतरही जपतेस मग तू हरवते पिलावळीत...... माझ्या लेकरांना मोकाट सोडून... तू रहाटगाडगे घुमविते तीन तीन कप्प्यांचे सूर्योदया पासून चंद्रास्तापर्यंत  अविरत.. अहोरात्र..... मला हिंदोळत        जयवंत कुलकर्णी 
     माझे पोलाद वितळते माझे पोलाद वितळते तुझ्या खोल पापण्यात वारी होते पावलांची तुझी वाट पाहण्यात ओंजळीची होती कमळे बाहूंचे झुलती झोपाळे शब्दात उमटतो वेद तुझ्या अश्रूंचा खेद ओठी माझ्या धनुष्याला तुझ्या नजरेचे तूनीर बुद्धीच्या प्रेरणेला अवघा तुझाची विचार           जयवंत कुलकर्णी