.... आणि मी मुंबई मराठी पत्रकार संघात पोहचलो. मे कि जून नेमकं आठवत नाही , परंतु त्याच महिन्यांच्या दरम्यान १९९७ सालची ही गोष्ट. एम.ए. इंग्रजी ची परीक्षा पुण्याच्या वाडिया कॉलेजमधून दिल्यानंतर पुढे नक्की काय करायचं, कुठे जायचं हा एक मनातल्या मनात छळणारा प्रश्न होता. वडील पोस्टात पॅॅकर म्हणून पंचवीस वर्ष सेवा करून १९९५ ला निवृत्त झाले होते. त्याकाळी केंद्र सरकारी कर्मचार्यांना जेमतेम घर चालेल इतकाच पगार असायचा. त्या तुलनेत पेन्शन तर निम्म्याहून कमी मिळायची. वडीलांना सुमारे सतराशे रुपये मिळत होती. त्यात मागून शिकत येणारा धाकटा भाऊ अविनाश , मी, आई, दीड एकर शेती अस छोट कुटुंब अत्यल्प पैशातही आनंदाने चालत होत. त्या आधी पाच वर्षांपूर्वी थोरली बहिण ज्योत्स्नाचा विवाह झाला होता. तिच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज कसेबसे फिटत आले होते. नेवाशाच्या छोट्याशा खरवंडी नामक गावातून आलेला मी ,१९९३ला बारावी नंतर शिक्षणासाठी घर सोडलेलं. वडिलोप...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा