संदर्भ कविता

 संदर्भ...


ऐकूच जात नाही असेही काही असतात 

दीर्घ आवाज, काही शब्द, काही कटाक्ष

काळाच्या वेदीवर, रोज आहुती पडते

आठवणींची, वेदनेची आणि आश्रुंची.

खरतर माहीतच नव्हतं असेही असतात

काही दिवस, काही रात्री काहीं  रवंथ...


कळतच नाही ना , असेही काही असतात

उसासे, काही टीपं, काही कोपरे, एकांत

खरतर नि:शब्द करून जातात ना काही

वर्तनाची आवर्तनं, तकलादू नितीशास्त्र, कारण काळ बदलतो ,तशी माणसंही...

त्यांनाही असतातच की प्राक्तनाचे संदर्भ.


 जयवंत.

( २ सप्टेंबर, २०२० )

टिप्पण्या

  1. खूप छान कविता आहे. देशातील तसेच महाराष्ट्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आपण
    marathibatmya.in
    ह्या वेबसाईटला आवश्य भेट द्या

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गुरुजनहो गतिमान होऊया !

तिन्ही सांजेला कविता