माझे पोलाद वितळते
माझे पोलाद वितळते
तुझ्या खोल पापण्यात
वारी होते पावलांची
तुझी वाट पाहण्यात

ओंजळीची होती कमळे
बाहूंचे झुलती झोपाळे
शब्दात उमटतो वेद
तुझ्या अश्रूंचा खेद

ओठी माझ्या धनुष्याला
तुझ्या नजरेचे तूनीर
बुद्धीच्या प्रेरणेला
अवघा तुझाची विचार

          जयवंत कुलकर्णी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी आणि मुंबई मराठी पत्रकार संघ

करीयरची सप्तपदी

गुरुजनहो गतिमान होऊया !