अहोरात्र
अहोरात्र
सकाळी तुझी रोजच धांदल उडते
अर्धा बिछाना आवरून
नजरेचे पांघरुन
ओठांवरचे चांदणे
केसांचे ढग सारून
अंगणा आधी सडा पडतो माझ्यावर
तुझ्या चुंबनांचा
पहाटेच दौडत निघते
उगवतीला न्हाऊन
रथाची चाके पळवितेस
तुझ्या मनाचे महाभारत
फलटाचे कुरुक्षेत्र आणि
माझाही संजय होतो
अर्ध ओल्या केसांना सुकवत तू झोपेची घडी घालून पुन्हा कुशीत शिकतेस, माझ्याच विचारांच्या उबदार पांघरुणात अलगद विसावते, कानात पुटपुटत, ओठांनी कानपाळी चुंबून म्हणतेस, मला जवळ घेशील, थकले रे, पण..
तुला सोडावत नाही
वेगाला लगाम लावतेस
दोन थेंब टिपतेस विरहाचे, फलाटाचे अंतरही जपतेस मग
तू हरवते पिलावळीत......
माझ्या लेकरांना मोकाट सोडून...
तू रहाटगाडगे घुमविते तीन तीन कप्प्यांचे
सूर्योदया पासून
चंद्रास्तापर्यंत अविरत..
अहोरात्र..... मला हिंदोळत
जयवंत कुलकर्णी

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा