अनटोल्ड


अनटोल्ड

तुला जमले तरच  बोलत जा
हाकेला उत्तर देत जा नजरेला नजर देत जा
आलाच राग कधी तरी
त्यालाही रस्ता देत जा.

चंद्र चांदण्या पाहात जा कोवळी उन्हं झेलत जा ओठांना लाली लावत जा
पापण्यातले काजळी कोन रेखीत जा
जगभर जगणं जगत जा

चालताना थोड थांबत जा
तुझे उसंत श्वास घेत जा
आरशातला अवतार पहात जा
सगळे सगळे सोडुन
घोटभर पाणी पित जा.

एकटीच आडवाट तुडवत जा आॅफिसला दांडी मारत जा हवं नको ते सगळंच करत जा
तू माझी असलीस म्हणून काय झालं
तुझ्याही मनाचं ऐकत जा
मी तर आहेच गं तुझा
तूही तुझं आयुष्य जगत जा
तूही तुझं जगणं जगत जा.

       जयवंत कुलकर्णी 

टिप्पण्या

  1. ब्लॉग सर्व भावना व्यक्त करत आहे तसेच प्रत्येकाने स्वतःच्या मनाप्रमाणे वागले पाहिजे हे पण सूचित करत आहे खूप छान ब्लॉग सर......

    उत्तर द्याहटवा
  2. तुमच्या लेखणीचे क्षितीज सदैवअसेच विस्तारत राहो, सर. फार सुंदर.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गुरुजनहो गतिमान होऊया !

तिन्ही सांजेला कविता