गोफ शैक्षणिक नात्यांचा ‘’ तुमची मुले ही तुमची नाहीतच, चिरंजीव होऊ इच्छिणाऱ्या जीवनाच्या उत्कट आकांक्षांची ती मुले आहेत, तुमच्या देहाच्या वाटेने ती आलेली असली तरी तुम्ही केवळ निमित्त मात्र आहात. तुम्ही त्यांना आपलं प्रेम दया, पण आपले विचार मात्र देऊ नका. तुम्ही त्यांच्यासारखे खुशाल व्हा, होण्याचा प्रयत्न करा पण... त्यांना तुमच्यासारखे बनविण्याचा विचारही करू नका. लक्षात ठेवा, जीवन हे भूतकाळात रेंगाळत नसते, ते नेहमी पुढे जात असतं .’’ – खलिल जिब्रान पालकत्वावर चिंतनशील भाष्य करताना प्रसिद्ध लेबनॉन साहित्यिक खलिल जिब्रान ( १८८३ ते १९३१ ) यांचे एक अतिशय गाजलेलं अवतरण आजही समस्त पालक वर्गास चपखलपणे लागू पडते. भारतात २००९ साली लागू झालेला शिक्षण हक्क कायदा, आजच्या व्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तसेच बालकाच्या स्वतंत्र अस्तित्वाच...